पुणे : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. यातच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल आहे. त्याचसंदर्भात आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत आहे. तसेच शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांबाबतही आज कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी आधीच कायदेतज्ञ उज्जवल निकम यांनी निर्णय कुणाच्याबाबत लागणार याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
विधानसभेची जोपर्यंत मुदत आहे. त्या मुदतीच्या आत हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्ष हे स्वत: कायदे पंडित असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे मत नोंदवले आहेत. त्यांचा आदर ठेवून सत्ता संघर्षाबाबतची कारवाई कधी संपेल याचा वस्तूनिष्ठ अहवाल विधानसभा अध्यक्षांना सुप्रिम कोर्टाला द्यावा लागेल. जेणेकरून विधिमंडळ व न्यायव्यवस्था यांच्यात कुठलाही अभाव निर्माण होणार नाही. असं उज्जल निकम यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू,” भाजप नेत्याची अजित पवारांवर टिका, वाद चिघळण्याची शक्यता
न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ यात कुठलाही संघर्ष होऊ नये म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना घटनेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार आम्ही जे मत व्यक्त केले आहेत. त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा न्यायमूर्तींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांना दोन आठवड्यात त्यांचा अहवाल हा द्यावा लागेल. आतापर्यंत त्यांनी काय कारवाई केली आणि किती दिवसात निकाल देणार ? असे या अहवालात त्यांना द्यावे लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश