पुणे : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. यातच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल आहे. त्याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यातच आता पुन्हा कोर्टाने पुढील तारीख दिली असून तीन आठवड्याच्या नंतर यावर सुनावणी पार पडणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी घ्यावी, असे निर्देश सुप्रिम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.
हेही वाचा…शिवसेना कुणाची ? निर्णय कुणाच्या बाजूने लागणार? कायदेतज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान
शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद वकील कपिल सिब्बल म्हणाले, “शिवसेना चिन्हाचे प्रकरण तुम्हाला ऐकावं लागेल. कृपया तारीख निश्चित करावी. त्यावर, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात, भाजप नगरसेवकांसह ४ जण जागीच ठा’र
दरम्यान, ११ मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं होतं. पण, ११ मेनंतर काहीही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. “विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली, ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू,” भाजप नेत्याची अजित पवारांवर टिका, वाद चिघळण्याची शक्यता
हेही वाचा…शिंदे गट अपात्र होणार ? शिंदे गटाची धाकधूक वाढली, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आदेश
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर कोर्ट नाराज, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना दिला इशारा