छत्रपती संभाजीनगर : अलिकडेच राज्य सरकारची कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल ५९ हजार कोटींची घोषणा केली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली. त्याचदरम्यान, शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. यावरून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. त्याला पलटवार म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठं विधान केलं.
हेही वाचा…“लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू,” भाजप नेत्याची अजित पवारांवर टिका, वाद चिघळण्याची शक्यता
शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दोन पिलांना जन्म दिला. त्यांचे नाव ठेवण्यासाठी चिठ्ठा काढण्यात आल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य नाव आले. पण ती चिठ्ठी बदलण्यात आली. यावर प्रश्न विचारले असता. खैरे म्हणाले की,सरकार आदित्य ठाकरे यांना घाबरत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. हे सगळे ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात. त्यामुळे मी लिहून देतो, आदित्य ठाकरे लकरच लवकर राज्याचे मुख्यमंत्री होणार.
हेही वाचा…शिंदे गट अपात्र होणार ? शिंदे गटाची धाकधूक वाढली, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आदेश
दरम्यान, सरकारने मराठवाड्यासाठी काही दिले नाही. महापालिकेचा ८५० कोटींचा प्रस्तावही मान्य झालेला नाही. चारशे कोटी देऊ सांगितले होते, पण दिले नाही. मराठवाड्यातील उबाठा गटाच्या आमदारांना काही दिले नाही. असा आरोप देखील चंद्रकांत खैरे यांनी भाजपस महायुती सरकारवर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा