पुणे : धनगर आरक्षणावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली आहे. लबाड लांडग्यांचं पोरगं असं म्हणत त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टिका केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…शिंदे गट अपात्र होणार ? शिंदे गटाची धाकधूक वाढली, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आदेश
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्या म्हणाल्या. स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात, समस्त धनगर समाजाला, आरक्षण विरोधी भाजपच्या दावणीला बांधु पहातो. अरे. लबाडा धनगर समाज एवढा मुर्ख नाही, शेळ्यांमेंढ्यांच्या कळपात घुसलेला, राखणदार नसून चोर लबाड लांगडा कधीच ओळखला आहे.
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर कोर्ट नाराज, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना दिला इशारा
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या बाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, ही लाबड लांडग्याची लेक बोलतोय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर चढवला.
READ ALSO :
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू,” भाजप नेत्याची अजित पवारांवर टिका, वाद चिघळण्याची शक्यता