मुंबई : आमच्यासाठी हा भावनिक काळ आहे. आज आपण संसदेच्या नवीन इमारतीत एका नव्या भविष्याचे उद्घाटन करणार आहोत. जुने संसद भवन आणि विशेष: हे सेंट्रल हॉल आपल्याला भावूक बनवते आणि प्रेरणाही देते, आपल्या राज्य घटनेने येथे आकार घेतला. आणि संविधान सभेच्या बैठकाही झाल्या. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी सेंट्रल हॉलमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जुने संसद भवन आता संविधान भवन म्हणून ओळखलं जाईल. असंही मोदींनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ब्रिटिश सरकारने १९४७ मध्ये येथे सत्ता हस्तांतरित केली. आमचे हे मध्यवर्ती सभागृह त्या संपूर्ण प्रक्रियेचा साक्षीदार आहे. येथेच तिरंगा आणि राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्यानंतरही येथे ऐतिहासिक प्रसंगी दोन्ही सभागृहांत बैठका झाल्या. १९५२ नंतर जगातील सुमारे ४१ राष्ट्रपतींनी आमच्या सर्व खासदारांना या सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले आहे. येथे संयुक्त अधिवेशन बोलावून कायदेही करण्यात आले.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
दरम्यान, याच सभागृहात झालेल्या संयुक्त अधिवेशनात बँकिंग सेवा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि दहशतवादविरोधी कायदाही मंजूर करण्यात आला. या संसदेत मुस्लिम बहिणी आणि मुलींनाही तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य देण्यात आले. या सभागृहात ट्रान्सजेंडर्सनाही न्याय देण्यात आला. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित