मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. लबाड लांडग्यांची पोरं असा उल्लेख केल्याने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज सोलापूरात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. यामुळे आज सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
सत्तेच्या नशेत गोपीचंद पडळकरांचे मानसिक संतुलन ढळलेय. माझी विनंती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर योग्य उपचार करावे. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपचार करेल. त्यांना जी भाषा समजेल त्याच भाषेत त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही. आम्ही पडळकरांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या बाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, ही लाबड लांडग्याची लेक बोलतोय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर चढवला.
सत्तेच्या नशेत या गोपीचंद पडळकरांचे मानसिक संतुलन ढळलेय. माझी विनंती आहे श्री. देवेंद्रजींना की त्यांचेवर योग्य उपचार करा. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपचार करेल. त्यांना जी भाषा समजेल त्याच भाषेत त्यांचेवर उपचार करण्यात येतील. आदरणीय @PawarSpeaks पवार साहेब आणि सौ.…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) September 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक