मुंबई : केंद्र सरकारचं सध्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. आज पासून संसदेचं कामकाज नव्या संसद भवानातून सुरू होत आहे. तर संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३०टक्के आरक्षण देण्याची केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यावर आता चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा हटवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली केली आहे.
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश
लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते. आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देताना संसदेत घटना दुरुस्ती केली जाते. या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासूनही घटनात्मक संरक्षण दिले जाते. मग हाच न्याय मराठा आरक्षणाला का मिळत नाही? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटविण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती का केली जात नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणासह धनगर, ओबीसी आरक्षण चर्चेत आला आहे. यातच आता केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं असून आरक्षणाची मर्यादा हटवण्यासंदर्भात कायदा करावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते.
आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देताना संसदेत घटना दुरुस्ती केली जाते. या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासूनही घटनात्मक संरक्षण दिले जाते.
मग हाच न्याय मराठा…— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर