मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर ढकलली आहे.
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही १० ऑक्टोबरला होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पण अध्यक्षांकडून होत असलेल्या कथित दिरंगाईमुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३ ऑक्टोंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कम्प्युटर जनरेडेट तारखा असल्यामुळे यामध्ये बदल होण्याची देखील शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
दरम्यान, जुलै महिन्यातल्या सुनावणीत अध्यक्षांना नोटीस बजावून कोर्टाने उत्तरासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला होता, पण नंतर कोर्टातलीच तारिख आली आहे. जवळपास दीड महिन्यानंतरची यावेळी ३ ऑक्टोंबर सुनावणी होते का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा