पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात काल केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयवादावरून काल लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा गोंधळ बघायला मिळाला. महिला आरक्षण विधेयकावरून आता संसदेत चर्चा केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही महिला आरक्षण आता लागू न होता २०२६ नंतर लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात. एक म्हणजे, राज्य सरकारप्रमाणे बोलून मोकळ व्हायचं आणि निघून जायचं. अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते, किंवा दुसरं म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलून वन नेशन वन इलेक्शन च्या नावाखाली विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याचा विचार असू शकतो.
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोरदार सुरूय. परंतु याला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काही काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही #महिला_आरक्षण आता लागू न होता 2026 नंतर लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात…
एक म्हणजे, राज्य सरकारप्रमाणे #बोलून_मोकळ_व्हायचं_आणि_निघून_जायचं अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते…
किंवा
दुसरं म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका 2026…— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात