पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात काल केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयवादावरून काल लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा गोंधळ बघायला मिळाला. महिला आरक्षण विधेयकावरून आता संसदेत चर्चा केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यावर आता भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही महिला आरक्षण आता लागू न होता २०२६ नंतर लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात. एक म्हणजे, राज्य सरकारप्रमाणे बोलून मोकळ व्हायचं आणि निघून जायचं. अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते, किंवा दुसरं म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलून वन नेशन वन इलेक्शन च्या नावाखाली विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याचा विचार असू शकतो. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”
दरम्यान, अफवा पसरवून महाराष्ट्र पेटवण्यात आणि नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत आहेत. पण नातवाला सगळ्याच क्षेत्रातले अगदी अर्धवट ज्ञान असल्याचे दिसते आहे. निवडणुका 2024 ला झाल्या काय आणि 2026 ला झाल्या काय, तसेही नरेंद्र मोदी परत सत्तेत येणार आहेत. त्यामुळे कितीही आदळआपट केली, तरी तुम्ही नारी शक्तीला जे एवढी वर्ष सत्तेतून अलिप्त ठेवलं ती कसर मोदी भरून काढणार. असा घणाघात मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांवर चढवला आहे.
#बोलून_मोकळ_व्हायचं_आणि_अफवा_पसरवायच्या
अफवा पसरवून महाराष्ट्र पेटवण्यात आणि नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत आहेत. पण नातवाला सगळ्याच क्षेत्रातले अगदी अर्धवट ज्ञान असल्याचे दिसते. अरे बाबा @RRPSpeaks, निवडणुका 2024 ला झाल्या काय आणि 2026… https://t.co/Qu5yJknaLE
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन