मुंबई : भापज सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले गेले आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल असे दिसत आहे. विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला तरी त्याची अंमलबजावणी २०२४ च्या निवडणुकीसाठी होणार नसून देशातील कोट्यवधी महिलांचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. अशी टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर केली आहे.
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजुर झाले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसत नाही. लोकसभा व विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याआधी जनगणना होणे गरजेचे आहे, २०२१ साली होणारी जनगणना मोदी सरकारने अद्याप केलेली नाही, तसेच मतदारसंघ पूनर्रचना केल्यानंतरच हा कायदा लागू केला जाऊ शकतो. मतदार पूनर्रचना २०२६ साली होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी जनगणना आणि मतदारसंघ परिसीमन होईल का? हा खरा प्रश्न आहे, ही सर्व परिस्थिती पाहता महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी लगेच होईच असे दिसत नाही.
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
महिलांना राजकारणातही संधी देण्याच्या दृष्टीने स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ महिला आरक्षण दिले. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार असताना सोनियाजी गांधी यांच्या पुढाकाराने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मांडून ते मंजूर करण्यात आले. महिला आरक्षण विधेयकासाठी सोनियाजी गांधी ह्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. भाजपाची आरक्षण व महिलांबाबतची भूमिका पाहता या विधेयकाची अंमलबाजणी होईल असे वाटत नाही. भाजपाला आता लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा पाठिंबा मिळावा यासाठी मोदी सरकारची धडपड सुरु आहे आणि केवळ निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे विधेयक आणले आहे. असंही पटोले म्हणाले.
मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘#जुमला’च
२०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही; मोदींकडून कोट्यवधी महिलांचा #भ्रमनिराश.
महिला आरक्षण विधेयक #इव्हेंट_मॅनेजमेंटशिवाय दुसरे काही नाही.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत… pic.twitter.com/EuAcjxC5lA
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”