मुंबई : संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. यातच काल संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल एकत्र आल्याचं दिसून आलं. त्यांनी याचे फोटो काल ट्विटवर देखील शेअर केलेत. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर प्रश्नाचं उत्तर देतांना राऊत म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ? हे मला माहिती नाही. पण शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. शरद पवारांनी फुटीर गटाविरूद्ध निवडणुक आयोग आणि न्यायालयात खटला दाखल केला असून फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही केली असल्याचं राऊत म्हणाले.
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
दरम्यान, गणेश चर्तुर्थीच्या पवित्र मुहर्तावर लोकसभेचं कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसदेत सुरू झालं. पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केलंय. यावेळी देशातील सर्व खासदारांचं फोटो सेशन फार पडलं. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत असलेला फोटो ट्विट केला. त्यावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
An electrifying day at the new Parliament House! The Rajya Sabha Chamber is a marvel, and sharing this moment with Hon’ble Sharad Pawar Saheb makes it even more special. And now, savoring some snacks and camaraderie with friends in the cafeteria – truly a day to remember! 🇮🇳… pic.twitter.com/Z1J105wHn9
— Praful Patel (@praful_patel) September 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”