नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. यातच गणेश चतुर्थीच्या शुभ महुर्तावर लोकसभेचं कामकाज नव्या संसेदत सुरू झालं आहे. यावेळी लोकसभेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा होत आहेत. या चर्चांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग घेतला. यात त्यांनी भाऊ बहिणींच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
प्रत्येक वृत्तपत्राने महिला आरक्षणाच्या विधेयकांचं कौतूक केलं आहे. पण सोबतच त्यांनी कॅनडा येथील प्रकरणाचीही बातमी छापली आहे. त्यावरही चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्रात मराठा, धनगरस लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणांचा विषय प्रलंबित आहे. त्याचीही चर्चा झाली पाहिजे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका वक्त्याला दुरूस्त करताना महिलांच्या भल्याचा विचार भाऊ का करू शकत नाही, असं विधान केलं. त्यांनी म्हटलं ते खरचं आहे. पण बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात. प्रत्येकांचं नशीब इतकं चांगलं नसतं. असं विधान सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
दरम्यान, यातच महिला आरक्षणाप्रमाणेच ओबीसी, एससी, एसटी यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. महिला आरक्षण तत्काळ लागू होणार नसेल, तर आता हे अधिवेशन बोलावण्याचं प्रयोजन काय. हे विधेयक हिवाळी अधिवेशनातही आणता आलं असतं. या आरक्षणाच्या माध्यमातून सरकार पुढच्या तारखेचा चेक देत आहे, असं सुळे म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”