पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर काल भाजप आमदार नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली. त्यावरून आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते सुरज चव्हाण यांनी याबाबत भाजपला खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर एकाच माळेचे मणी आहेत. टिका करताना आपली भाषा संवैधानिक राहावी. नारायण राणे लघू आणि मध्यम उद्योगात आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकले नाहीत, ही टिका झाली. तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर टिका करणाऱ्यांना त्याच भाषेत, त्याचवेळी समजले असं उत्तर देण्यात येईल. असा इशाराही सुरज चव्हाण यांनी दिलाय.
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
दरम्यान, महाविकास आघाडीत अजित दादांवर उठसूट टिका करणारे आणि सामनात अग्रलेख लिहिणारे कसे चालतात ? संजय राऊतांना अजित दादांवर बोलायला कोणाचा आशीर्वाद होता ? संजय राऊतांना वेगळा न्याय आणि गोपीचंद पडळकरांना वेगळा न्याय का ? संजय राऊतला मुकसंमती होती काय ? असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार