पिंपरी : सध्या लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा केली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुर्वी विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूरी मिळाली तर शहरातील राजकीय गणिते बदलणार आहेत. या विधेयकामुळे लोकसभा, विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार लोकसभेत महिलांची संख्या १८१ वर पोहचणार आहे.. या आरक्षणामुळे मावळ लोकसभेसह आणि पिंपरी-चिंचवड आणि भोसरी यापैक एका विधानसभेत महिलांना संधी मिळणार आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास शहरातील राजकीय गणिते बदलणार आहेत. चिंचवड महिला राखीव झाल्यास विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना संधी मिळेल. महाविकास आघाडीकडून या मतदार संघात सक्षम महिला उमेदवार नाही. दुसरीकडे, या मतदार संघातून तीव्र दावेदार असलेले भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना संधी मिळणार नाही किंवा कुटुंबातील महिला उमेदवार द्यावा लागणार आहे.
हेही वाचा…“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
महिला विधेयकानुसार भोसरी विधानसभा मतदार संघ महिला राखीव झाल्यास भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांना धोका आहे. याउलट, शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांना संधी निर्माण होणार आहे. कदम आणि उबाळे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली आहे. लांडगे यांना आमदारकी राखायची असेल, तर महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इव्हेंट’ ‘‘इंद्रायणी थडी’’ च्या संयोजिका त्यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे यांना उमेदवार म्हणून ‘लॉन्च’ करावे लागेल. दुसरीकडे, माजी आमदार लांडे यांच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्यवती माजी महापौर मोहिनी लांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पर्याय निवडू शकतात.
दरम्यान, आरक्षण लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे विधानसभा आणि मावळ लोकसभेतील ताकदीने महिलाराज येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजकीय आरक्षणाचा पूर्ण लाभ महिलांना मिळणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी