पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी जाहीर केला आहे. या संकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र सोनवणे हे येत्या २९ सप्टेंबर रोजी आता आणखी नवीन घोषणा करणार असल्याचे सांगितले जात असून आता ते नेमकी काय घोषणा करणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नरमध्ये गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा देखील भव्यदिव्य उभारला जाणार आहे. या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार असून त्यांच्या निर्मितीसाठी शिल्पकार देखील निश्चित करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं आहे. सोबतच २९ सप्टेंबर रोजी आणखीन तीन महत्वाच्या घोषणा आणि पुतळा उभारणी कामाचा सविस्तर आराखडा मांडण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
दरम्यान, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत तर त्यांनी सांगितले मात्र आणखीन तीन महत्वाच्या घोषणा काय असू शकतात याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोनवणे यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोनवणे यांनी नुकताच या घोषणेचा एक भाग समोर मात्र आता आणखीन तीन मोठ्या घोषणा नेमक्या काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा