मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशोरे ओढले आहेत. शिवसेनेच्या १६ आमदारांबाबत एका आठवड्यात निर्णय घ्या, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपने प्लॅन बी देखील तयार ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
शिवसेना १६ आमदार अपात्रतेसंदर्भातच्या निर्णयात विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याची याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडसावत याबाबत एक आठवड्यात सुनावणी घ्या, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात एकनाथ शिंदे अपात्र होणार असल्याची चर्चा कायदेतज्ञांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकार वाचविण्यासाठी भाजपने बी प्लॅन देखील तयार ठेवला आहे.
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजप पुढचा पर्याय असणार आहे. याशिवाय भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजप पुढची चाल खेळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी