पुणे : राज्यात महायुती सरकार आल्यानंतर सरकारी जाहिरातीवर प्रंचड खर्च करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. मध्यंतरी सरकारी जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचंही दिसून आलं. यातच आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची वृत्तपत्रावर एक जाहिराती दिली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
रोहित पवारांनी असं म्हटलंय की, एका राष्ट्रीय वृत्तपत्रात फुल पेज जाहिरात द्यायला सरासरी २० लाख रु. खर्च येतो. काही वृत्तपत्र तर ५० लाख रु. पर्यंत घेतात. दीड-दोन कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊन शासकीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण शाळांसाठी, भरतीसाठी, शासकीय रुग्णालयात औषधं देण्यासाठी मात्र सरकारकडे पैसे नाहीत.
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडमध्ये शासकीय रुग्णालयांचं ४० % काम झालं परंतु पुढचा निधी दिला जात नसल्याने निधीअभावी काम ठप्प झालंय. शासनाच्या दिरंगाईमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर शासन जबाबदारी घेईल का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री साहेब सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा राज्याच्या आरोग्यव्यवस्थेकडं थोडं लक्ष दिलं तर बरं होईल. असा टोलाही त्यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे.
एका राष्ट्रीय वृत्तपत्रात फुल पेज जाहिरात द्यायला सरासरी २० लाख रु. खर्च येतो… काही वृत्तपत्र तर ५० लाख रु. पर्यंत घेतात. दीड-दोन कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊन शासकीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण #शाळांसाठी, #भरतीसाठी,… pic.twitter.com/lHVMp3cWu8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश