पुणे : राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव सतत चर्चेत राहिलं आहे. यातच उपमुख्यमंत्री पदाची सर्वात जास्त वेळा शपथ घेण्यामध्येही अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. परंतु त्यांना अद्यापही मुख्यमंत्री पद भुषवता आलं नाही. यातच आता गणेश उत्सवाच्या निमित्ताने देखाव्यात अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाचा देखावा उभारला आहे. याची सध्या जोरदार चर्चा राजकारणात सुरूय.
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
पुण्यातील नांदेड सिटीत राहणारे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी राजभवनाची प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना दाखवण्यात आलं आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, पवार साहेब, नितीन गडकरी, रामदास आठवले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांची उपस्थिती दाखवण्यात आली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
राजकीय नेत्यांसोबत बॉलीवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान,सलमान खान, रजनीकांत, नाना पाटेकर, अशोक सराफ अशा मराठी सिनेमातील अभिनेत्यांचा त्यात सहभाग दाखवण्यात आला आहे. जाड पुठ्ठ्याचे शीट वापरण्यात आले असून डिझाईन केलेले फ्लेक्स, एलईडी लाईट, अजित पवार अर्थमंत्री असताना घेतलेले निर्णयाचा माहिती फ्लेक्स, असंही देखावण्यात दाखवण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल