सोलापूर : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्ग -३ व ४ च्या १० हजार ४९ जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी आतापर्यंत सव्वादोन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शुक्रवारी अर्ज करण्याची मुदत संपणार असून पदभरतीतून तब्बल २६५.५४ कोटींचे शुल्क सरकारला मिळाले आहेत. तर उर्वरित शासकीय विभागांमध्ये ४० ते ६० हजार पदांची आणखी भरती होणार असून त्यातूनही अंदाजे ५०० कोटींहून अधिक शुल्क जमा होणार आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
महायुती सरकारची वसुली राज्यातील बेरोजगार तरुणांची लूट चालु आहे. तलाठी परीक्षा भरतीत १०० कोटींची वसुली, जिल्हा परिषद परीक्षेत १४५ कोटींची वसुली, आरोग्य विभाग परीक्षेत २३ कोटींची वसुली, अशी एकूण २६८ कोटींची वसुली झाली आहे. एका विभागातील पदांसाठी एकच शुल्क आकारले जाईल, हे आश्वासन अर्धे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्या आश्वासनाच काय झालं ? असा सवाल आता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण
दरम्यान, राज्यात मागील साडेचार महिन्यांपूर्वी गृह विभागातर्फे पोलीस भरती पार पडली. त्यावेळी १८ हजार ८३१ जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातूनही कोट्यवधींचे शुल्क मिळाले आहे. आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने ७५ हजार पदांची मेगा भरती जाहिर केली आहे.
महायुती सरकारची वसुली
राज्यातील बेरोजगार तरुणांची लूटतलाठी परीक्षा – १०० कोटींची वसुली
जिल्हा परिषद परीक्षा – १४५ कोटींची वसुली
आरोग्य विभाग परीक्षा – २३ कोटींची वसुली
एकूण : २६८ कोटींची वसुली.एका विभागातील पदांसाठी एकच शुल्क आकारले जाईल हे आश्वासन अर्धे उपमुख्यमंत्री अजित… pic.twitter.com/jVIekKG6F4
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…“शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आराखडा तयार करा,” अजितदादांचा पुण्यासाठी मोठा निर्णय
हेही वाचा…“त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती..,” पहिल्यांदाच रूपाली चाकणकरांची सुळेंवर अप्रत्यक्ष टिका
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा