मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत आढावा बैठक आज पार पडली. लोणावळामधील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी व परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागानं सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत
लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीनं नियोजन करण्यात यावे, असं अजित पवार यांनी सूचित केलं.
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावं. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसंच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशा सूचना देखील अजित पवार यांनी दिल्या.
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
याबरोबरच मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा झाली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक माहिती संकलित करावी, अशी सूचना अजित पवारांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती..,” पहिल्यांदाच रूपाली चाकणकरांची सुळेंवर अप्रत्यक्ष टिका
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण