मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू आहे. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी पडळकरांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर जोरदार टिकास्त्र सोडलंय.
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
पक्ष फुटीसंदर्भात सर्व न्यायालयीन प्रक्रिया कोर्टात सुरू आहे. भाजपकडून अजित दादांचं खच्चिकरण केलं जात आहे. पडळकर सारख्या सामान्य आमदारांकडून टिका केली जात आहे. मग सत्तेसाठी लाचारी पत्करणारे पडळकरांना उत्तरं देतील ही महाराष्ट्रातील तमान जनतेची अपेक्षा होती. परंतु लाचारी इतकी आहे की, त्याला उत्तरंही देऊ शकत नाही. असा टोला देखील वडेट्टीवारांनी लगावला आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू
दरम्यान, ब्लॅकमेल करून खासदार आमदारांच्या सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यावर ते म्हणाले की, एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच नावं दिलं आहे का? बघावं लागेल. आमदारांचे एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणारं नाही असं सांगितल जातं आहे. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा