नाशिक : राज्यात पक्ष फुटीप्रकरणानंतर अनेक जण आता पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील राजकीय नेते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी करतांना दिसत आहेत. यातच नाशिक येथील शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय कुमार अहेर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे तात्काळ पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय कुमार अहेर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उदय कुमार अहेर यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. यापुढील काळात राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांना आरूढ करण्यासाठी, राज्यभरातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण जोमाने कार्यरत असणार, असं उदय कुमार अहेर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम
उदय कुमार अहेर यांच्यासह वैशालीताई जवंजाळ यांची महिला प्रदेश सरचिटणीस पदी, तसेच बुलढाणा येथील नेते पंजाबराव देशमुख यांची प्रदेश चिटणीस पदी व नंदूरबार येथील ज्येष्ठ नेते संतोषराव मराठे यांची प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, शिवाजीराव गरजे उपस्थितीत होते.
READ ALSO :
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू