पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीची पुढील राजकीय लढाई निवडणुक आयोग आणि कोर्टात होण्याची शक्यता आहे. परंतु निधीच्या बदल्यात अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केला आहे.
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
आपापल्या मतदारसंघात काम करण्याची जबाबदारी तिथल्या लोकप्रतिनिधीची असते, परंतु हे काम करायचं असेल तर तुला या कागदावर सही करावी लागेल. अशा पद्धतीने आवाज दबाण्याचा आणि व्यक्तीला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन असलेले प्रतिज्ञापत्र दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यावरही रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
दरम्यान, रोहित पवार म्हणाले की, एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच नावं दिलं आहे का बघावं लागेल. आमदारांचे एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणारं नाही. रोहित पवारांच्या आरोपानंतर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग