मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांच्या दिरंगाई कामकाजावरून सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर काल तातडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनिती ठरवल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचं सांगत ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी घेत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याची मुदत दिली. त्यावर काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर २५ सप्टेंबरला आमदार आपात्रतेबाबत पुढची सुनावणी विधानसभा अध्यक्ष घेणार आहे. तसेच गरज पडल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना उद्या नोटीस पाठवून सोमवारच्या सुनावणीसाठी उपस्थितीत राहण्यास सांगणार असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
दरम्यान, दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून विधानसभा अध्यक्षांनी रणनीती ठरवली आहे. केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून या केसमध्ये काम करायचं आहे. याची आठवण सुप्रिम कोर्टाने मागच्या सुनावणीत केली होती. त्यामुळे सोमवारच्या सुनावणीत कशा पद्धतीने कार्यवाही होते आणि पुढची तारीख विधानसभा अध्यक्ष काय देतात याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला