मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू आहे. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी पडळकरांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर जोरदार टिकास्त्र सोडलंय. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून आपण काँग्रेसमध्ये आलात, तेव्हा निष्ठा विकली होती का? खरे लाचार तर आपण आहात,आणि तुम्ही बोलावं? म्हणजे हा फार मोठा विनोद आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी आपण कोणाकोणाचे पाय धरले हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका. विदर्भातील जनतेला लाचाराची औलाद कोण आहे हे चांगल्या पद्धतीने माहित आहे. लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण या पदावर आहात हे विसरू नका. असा खोचक टोला मिटकरींनी विजय वडेट्टीवारांना लगावला आहे.
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
दरम्यान, पक्ष फुटीसंदर्भात सर्व न्यायालयीन प्रक्रिया कोर्टात सुरू आहे. भाजपकडून अजित दादांचं खच्चिकरण केलं जात आहे. पडळकर सारख्या सामान्य आमदारांकडून टिका केली जात आहे. मग सत्तेसाठी लाचारी पत्करणारे पडळकरांना उत्तरं देतील ही महाराष्ट्रातील तमान जनतेची अपेक्षा होती. परंतु लाचारी इतकी आहे की, त्याला उत्तरंही देऊ शकत नाही. असा टोला देखील वडेट्टीवारांनी लगावला आहे.
भाजपमध्ये जाण्यासाठी आपण कोणाकोणाचे पाय धरले हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका. विदर्भातील जनतेला लाचाराची औलाद कोण आहे हे चांगल्या पद्धतीने माहित आहे. लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण या पदावर आहात हे विसरू नका.@VijayWadettiwar
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी