नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपचे दक्षिण मतदारसंघाचे लोकसभा खासदार रमेश बिधूडी यांनी एका खासदाराला उद्देशून भडवा, कटवा, मुल्ला, आतंकवादी आणि उग्रवादी अशा प्रकारच्या असंसदीय शब्दांचा प्रयोग केला. त्यावरून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर सडकडून टिका केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी रमेश बिधूडी यांना तंबी देऊन सोडून दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
संसदेच्या नवीन इमारतीतही भाजपचे तेच जुने द्वेषपूर्ण विचार आहे. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना त्यांना दाखवत नाही, डरो मत बोलले तरी अशी विधान करू नका असे अध्यक्ष लगेच सांगतात. आणि आज भाजपचा एक खासदार पातळी सोडून बोलतो, ऐकणाऱ्याला ही लाज वाटेल अशी घाणेरडी भाषा वापरतो आणि अध्यक्ष त्याला फक्त तंबी देऊन सोडतात. हे लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला केला आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
दरम्यान, भाजप खासदाराची ही भाषा स्वर्गीय अटलजी, स्व.महाजन साहेब, स्व.सुषमा स्वराज यांच्या संसदेतील समृद्ध भाषणांचा अपमान नाही का? देशातील अल्पसंख्यांक समाजाबाबत भाजपचे विचार या खासदारांनी आपल्या भाषणातून मांडलेत का? असल्या भाषणांसाठीच नवीन संसद बांधलीय का? यासाठीच विशेष अधिवेशन बोलावले का? असे एक ना अनेक प्रश्न भाजप खासदाराच्या या भाषणानंतर देशातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले आहेत. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
संसदेच्या नवीन इमारतीतही भाजपचे तेच जुने द्वेषपूर्ण विचार…
राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना त्यांना दाखवत नाही, डरो मत बोलले तरी अशी विधान करू नका असे अध्यक्ष लगेच सांगतात.
आणि आज भाजपचा एक खासदार पातळी सोडून बोलतो, ऐकणाऱ्याला ही लाज वाटेल अशी घाणेरडी भाषा वापरतो आणि… pic.twitter.com/RnHUBKdYlA
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 22, 2023
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण दिल्ली मतदारसंघाचे लोकसभा खासदार रमेश बिधूडी यांनी लोकसभेत एका खासदाराला उद्देशून भडवा, कटवा, मुल्ला, आतंकवादी आणि उग्रवादी अशा प्रकारच्या असंसदीय शब्दांचा प्रयोग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलल्यामुळे खासदार अधीर रंजन चौधरी यांना अपात्र… pic.twitter.com/BQbrTayksD
— NCP (@NCPspeaks) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप