नागपूर : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर गेले आहेत. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचं निमंत्रण काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांनी दिलं आहे. मध्य प्रदेशात निवडणुका लढवण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. त्यासाठई कमलनाथ यांनी बोलावले आहे. या सोहळ्याला मध्ये प्रदेशात आलो आहे. कमलनाथ आणि आमचे नाते जूने आहे. आमचे सरकार असताना किंवा इंडिया आघाडी आकार घेत असताना कमलनाथ यांच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा झाल्या आहेत. त्यांनी अनेकदा चांगले सल्लेल दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ यांच्याशी वेगळे नाते असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
दरम्यान, मध्य प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत, तुम्ही निवडणुका लढविणार का ? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मध्यप्रदेशात निवडणुका लढवण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतली. इंडिया आघाडीत प्रचारासाठी काय रणनीति ठरते, त्यानुसार मध्य प्रदेशात प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतला जाईल. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक