पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीची पुढील राजकीय लढाई निवडणुक आयोग आणि कोर्टात होण्याची शक्यता आहे. परंतु निधीच्या बदल्यात अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केला आहे. त्यावर आता अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
पहिल्या टर्मचे असलेले आमदार आम्ही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेतली होती. रोहित पवारांचा आग्रह होता की आपल्याला भाजपसोबत जावं लागलं तर जावं लागेल. परंतु आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने अजित पवार दादांच्या अगोदर शरद पवारांपर्यंत पोहचवण्याच काम रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवार चार वर्षामध्ये दादा होऊ पाहत आहे. स्वंभू दादा होऊ पाहत आहे. त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थी म्हणू नये. अशी टिका आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केली आहे.
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
दरम्यान, रोहित पवार म्हणाले की, एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच नावं दिलं आहे का बघावं लागेल. आमदारांचे एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणारं नाही. रोहित पवारांच्या आरोपानंतर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल ?” शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टिका, आता ठाकरे गटाकडून आवाहन
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”