पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीची पुढील राजकीय लढाई निवडणुक आयोग आणि कोर्टात होण्याची शक्यता आहे. परंतु निधीच्या बदल्यात अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केला आहे. त्यावर आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
आपापल्या मतदारसंघात काम करण्याची जबाबदारी तिथल्या लोकप्रतिनिधीची असते, परंतु हे काम करायचं असेल तर तुला या कागदावर सही करावी लागेल. अशा पद्धतीने आवाज दबाण्याचा आणि व्यक्तीला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन असलेले प्रतिज्ञापत्र दिल्याची बातमी समोर आली आहे. आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल २ कोटींचा निधी अजित दादांनी आपल्याला दिला आहे. हा ब्लॅकमेल करून नव्हे तर आपल्या मागणीवरून आफल्याच मतदार संघाच्या विकास कामासाठी दिला आहे. काही पत्राचे केवळ नमुने तेवढे पाठवले आहेत, अजून यादी मोठी आहे. असं म्हणत मिटकरी यांनी रोहित पवारांचं अजित पवारांना दिलेले निवेदन ट्विट करत उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
दरम्यान, रोहित पवार म्हणाले की, एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच नावं दिलं आहे का बघावं लागेल. आमदारांचे एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणारं नाही. रोहित पवारांच्या आरोपानंतर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल २ हजार कोटींचा निधी अजित दादांनी आपल्याला दिलाय.हा ब्लॅकमेल करून नव्हे तर आपल्या मागणी वरून आपल्याच मतदार संघाच्या विकास कामासाठी! काही पत्राचे केवळ नमुने तेवढे पाठवले आहेत, अजुन यादी मोठी आहे.@RRPSpeaks pic.twitter.com/Sh8yzW7jRa
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी