नवी दिल्ली : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते मध्यप्रदेशमधील पांढुर्णा, छिंदवाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे उपस्थितीत होते. या सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केले. आता यावरून भापजने ठाकरेंवर टिका केलीय.
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व किंचित झालं आहे. त्यांना महाराष्ट्रात भवितव्य दिसत नसल्याने आदित्य ठाकरे आज मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे पोहचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा सोडून ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. आता मध्यप्रदेशात जाऊन आदित्य ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत आहे. अशी टिका भाजपने आदित्य ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
दरम्यान, खरं तर काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या आदेशानं पांढुर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं पाडण्यात आला होता. आज त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे जाऊन बसले आहेत. शिवरायांवर प्रेम करणारा मावळा हे कधीही सहन करणार नाही. आदित्य ठाकरे यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याचा वारसा धोक्यात आला. ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला. त्या काँग्रेससोबत तुम्ही कितीही गळ्यात गळे घाला, शिवप्रेमी जनता तुमच्यासह काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही ठाकरेंना देण्यात आला.
राज्यात @uddhavthackeray यांच्या शिवसेनेचं अस्तित्व किंचित झालं. इथं त्यांना भवितव्य दिसत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे आज मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा सोडून ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. आता…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 22, 2023
मध्यप्रदेशमधील पांढुर्णा, छिंदवाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण आज माजी मुख्यमंत्री कमलनाथ जी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
ह्यावेळी खासदार नकुलनाथ… pic.twitter.com/aqGu7JTVxz
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..