पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीची पुढील राजकीय लढाई निवडणुक आयोग आणि कोर्टात होण्याची शक्यता आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यातच अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर आरोप केले आहेत. त्यावर रोहित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं
भाजपसोबत जाण्याचा आग्रह सर्वप्रथम रोहित पवारांचा होता. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टर्मचे आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन भाजसोबत जाण्यास विनंती केली असल्याचा आरोप सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केला आहे. त्यावर सुनील शेळके यांचा आरोप हे हास्यस्पद आहे. पुर्ण विधान ऐकलं नाही. त्यामुळे यावर बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
दरम्यान, पहिल्या टर्मचे असलेले आमदार आम्ही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेतली होती. रोहित पवारांचा आग्रह होता की आपल्याला भाजपसोबत जावं लागलं तर जावं लागेल. परंतु आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने अजित पवार दादांच्या अगोदर शरद पवारांपर्यंत पोहचवण्याच काम रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवार चार वर्षामध्ये दादा होऊ पाहत आहे. स्वंभू दादा होऊ पाहत आहे. त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थी म्हणू नये. अशी टिका आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार ?”ऑनलाईन लाईव्ह दाखवा, वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् राहुल गांधींची सभा, जुन्नरमध्ये भाजपवर ‘या’ दिवशी जोरदार हल्लाबोल होणार”
हेही वाचा…“रोहित पवार चार वर्षातच ‘दादा’ होऊ पाहतोय, “आमदार सुनील शेळकेंची रोहित पवारांवर जोरदार टिका
हेही वाचा…“तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल ?” शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टिका, आता ठाकरे गटाकडून आवाहन
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका