मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांवरील सुनावणीला सोमवार २५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी घेणार आहेत. शिवसेना अपात्र आमदार प्रकरण फक्त महाराष्ट्रापुरतचं नाही तर या प्रकरणाचा परिणाम संपुर्ण देशात होऊ शकतो. यातच ही सुनावणी सर्व जनतेसमोर ऑनलाईन लाईव्ह व्हावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवून विधानसभा अध्यक्षांनी न्यायनिवाडा करावा, त्या अनुषंगाने बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे देखील महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षेपणाद्वारे व्हावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
दरम्यान, मागील एक दीड वर्षापासून शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र अद्यापही यावर कोणताही निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. परंतु विधानसभा अध्यक्ष या प्रकरणाचा निकाल देतांना दिरंगाई करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात याचिका देखील दाखल करत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्याची मुदत दिली आहे. याची आता सुनावणी सोमवारी पासून होत आहे.
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.
राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे… pic.twitter.com/h0z4LCuB4I
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् राहुल गांधींची सभा, जुन्नरमध्ये भाजपवर ‘या’ दिवशी जोरदार हल्लाबोल होणार”
हेही वाचा…“रोहित पवार चार वर्षातच ‘दादा’ होऊ पाहतोय, “आमदार सुनील शेळकेंची रोहित पवारांवर जोरदार टिका
हेही वाचा…“तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल ?” शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टिका, आता ठाकरे गटाकडून आवाहन
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं