पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत आल्या आहेत. बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसता. असं सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं होतं. परंतु हे विधान अजित पवारांबाबत केलं नव्हतं, असं स्पष्टीकरण आता सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. पुणे येथे त्या बोलत होत्या.
हेही वाचा…“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,” सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या
अमित शाह म्हणाले की एका पुरषानं जर महिला आरक्षणाचं विधेयक आणलं, तर काय हरकत आहे. जर एखादा भाऊ असं वागत असेल तर काय चूक आहे. मी त्यांना एवढचं म्हटलं की काश्मीर ते कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचं हित बघतातच असं नाही. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहणं सांगू शकते. त्यामुळे माझं विधान फक्त अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत होतं. असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
हेही वाचा…“भाजपसोबत जाण्याचा पहिला आग्रह रोहित पवारांचाच होता,” सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर आरोप
दरम्यान, भाजप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. परंतु त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यास त्यांनी केलेले आरोप गायब होतात. यामध्ये भाजप दुपट्टीपणा करतांना दिसत आहेत. भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“किती लोकांचे तोंड दाबतील?” सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलवर ७२ तासांची बंदी