मुंबई : केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर अमित शाह यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस, दिपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, पुनम महाजन आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते. यावरून राज्याचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले असता मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक ठिकाणी अमित शाह यांच्या स्वागतासाठी मंत्री सज्ज झाले. त्यावरून विजय वडेट्टीवार म्हणाले की, अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री आल्यावर सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचं नाही. आता हुजरेगीरीची पद्धत सुरू आहे. अशी टिका वडेट्टीवारांनी केली आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आशिष शेलार यांच्या वांद्र विभागातील गणपतीचंही दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपतीचं दर्शन घेऊन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेत. सायंकाळी ते एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल