नाशिक : अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही , जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाही तर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल ? यासाठीच रोहित पवारांचा खटाटोप आहे. असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा
अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांना विकास निधींवरून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर आता रोहित पवारांना अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांच्याबरोबर आमदार सुनील शेळके यांनी देखील रोहित पवारांनी अगोदर भाजपसोबत जाण्याच्या निर्णयासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार विरूद्ध अजित पवार गट असा सामना सध्या सुरू आहे.
हेही वाचा…सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान, शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते. काही नेत्यांचा ब्लॅकमेंलिंग सुरू आहे, तु सही कर नाही तर काम होणार नाही, असं कदाचित सांगितलं जात असावं. असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव