पुणे : काॅंग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर याने जमिनीच्या एका वादातून एका महिलेस अश्लील शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी शिवरकर यांच्यासह १६ जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींत अभिजीत शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड व त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर १० अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव
या प्रकरणाबाबत सुरेखा अजय खाडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या माहितीनूसार, तक्रारदार सुरेखा खाडे यांची वानवडीतील सिटी सर्व्हे क्रमांक 797-/53 क्षेत्र 8 आर ही त्यांची व त्यांच्या भावाची वडिलाेपार्जित मिळकत आहे. तक्रारदार या सदर जागेच्या वारस आहेत. सदर जागेची त्यांनी भुमापन अधिकारी क्रमांक 2 यांचेकडून सरकारी माेजणी केली असून त्याचा माेजणी क्रमांक 6305 असा आहे. सदर ठिकाणी तक्रारदार यांनी काही महिला व पुरुष कामगारांकडून कपांऊड लावण्याचे काम चालू केले होते.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा
आरोपींनी त्याठिकाणी येऊन कामगारांना काम करण्यापासून राेखले. तसेच लोखंडी खांब काढून टाकले. यावेळी अभिजीत शिवरकर व भास्कर गायकवाड यांनी महिलेस शिवीगाळ करत जमिन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला. तसेच आमच्यात आडवे आल्यास पाहून घेऊ अशी धमकीही दिली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी महिलेच्या साडीचा पदर ओढला. तसेच त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत बाहेर काढले. शिवीगाळ व दमदाटी करुन पुन्हा या ठिकाणी दिसलात तर तुमच्यासह तुमच्या भावकीचे येथेच मुडदे पाडू अशी धमकीही दिली.
हेही वाचा…सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
याप्रकरणी पाेलिस उपनिरीक्षक एस साेनवणे पुढील तपास करत आहेत. वानवडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सांगितले की, सदर प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पाेलिस पुढील चाैकशी करत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला