नागपुर : काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्ले झाल्याने नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करीत आहेत. तर आज सांयकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात दाखल होणार आहेत.
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट