नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपूर शहातील पुर पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक माणूस फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतांना फडणवीसांनी त्या व्यक्तीला हातानं ओढून घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून आता राज्यात विरोधी पक्षातीन नेत्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
उपमुख्यमंत्र्यांचे स्वतःच्याच कर्मभूमीवर, नागपुरातच लक्ष नाही; त्यांचे काय महाराष्ट्रावर लक्ष असेल मग ? आपला मतदारसंघ, आपण उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री ही पदे ज्या सर्वसामान्य जनतेमुळे मिळालीत त्याच नागपूरची सुधारणा काय होऊ शकली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी फक्त आणि फक्त सत्ता आणि राजकारण, सत्तेत आल्यावर इतर २ पक्ष फोडण्यात वेळ घालवला, कपटनीतीत गुंतलेत यासर्व गोष्टींवर गृहमंत्र्यांचे लक्ष असल्यामुळे स्वतःच्याच कर्मभूमीत ते काही सुधारणा करू शकले नाहीत. असा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला आहे.
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
कालपासून नागपुरात पावसाने रुद्र रूप धारण केलेलं आपण सर्व बातम्यांना पाहतच आहोतच, ४० वर्षांपासून नागपुरात फक्त सार्वजनिक कामांच्या घोषणाच दिल्या गेल्या हे आपण सर्वांनी काल पाहिलं, १६ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व गाजवत आहे, तरी आज हा दिवस. आता पाहणी आणि दौरे करून काही होणार नाही जे करायचे होते ते आधी केले असते, तर आज नागपूरवर ही महापूराची भीषण परिस्थिती उद्भवली नसती. इलेक्शन लागले लावा काम, इलेक्शन संपलेत सोडा ती अर्धवट काम..! असे काम जर चालू ठेवले तर सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजकारणापेक्षा आपल्या कर्मभूमीवर जरा लक्ष देऊन काम केले तर बरं होईल..! असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे स्वतःच्याच कर्मभूमीवर, नागपुरातच लक्ष नाही; त्यांचे काय महाराष्ट्रावर लक्ष असेल मग ?
आपला मतदारसंघ, आपण उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री ही पदे ज्या सर्वसामान्य जनतेमुळे मिळालीत त्याच नागपूरची सुधारणा काय होऊ शकली नाही. सत्तेच्या… pic.twitter.com/ezLo72A271
— NCP (@NCPspeaks) September 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल