अहमदाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांची अहमदाबाद येथील राहत्या घरी भेट घेतली आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांची भेट कौंटूबिक असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या भेटीनंतर आता देशातील राजकीय वर्तुळात मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीवर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी तर्क वितर्क लावले आहेत.
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
शरद पवार यांच्या मनात काय आहे ? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे अदाणींचे मित्र आहेत. अदाणी शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार आणि गौतम अदाणींच्या भेटीवर दिली आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, शरद पवार अदाणी आणि अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पाॅलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी