नागपुर : काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करीत आहेत. तर आज सांयकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात दाखल होणार आहेत. यावरून आता नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी भाजपशासित नागपूर महानगरपालिकेतून तब्बल २, ११७.५४ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपवर केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
नागपुरातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नाग नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नवी दिल्लीत जागतिक बॅंक, एनएमसीजी आणि नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २०२१ साली ग्रीन सिग्रल देण्यात आला होता. त्यानंतर नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी भाजपशासित नागपूर महानगरपालिकेकडून तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काॅंग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपशासित नागपूर महानगरपालिकेकडून तब्बल २,११७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु नेमका हा खर्च होऊन नाग नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त झाली का ? असा प्रश्न आता नागपूरमधील जलमय परिस्थिती पाहून विचारला जात आहे. संपूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी पाणी साठले असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. महानगरपालिकेच्या अक्षम्य कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्य नागपूरकरांना बसला आहे. त्यामुळे नागूपरमध्ये विकासाचे दावे करणा-या भाजपने वेळीच जर नाग नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष देऊन २,११७ कोटी रुपये प्रत्यक्ष काम पूर्णत्वास नेण्यावर खर्च केले असते तर आज ही पूर परिस्थिती उद्भवली नसती. असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपवर याचं खापर फोडलं आहे.
नागपुरातील महत्वाच्या मानल्या जाणा-या नाग नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नवी दिल्लीत जागतिक बँक, एनएमसीजी आणि नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २०२१ साली ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. त्यानंतर नाग नदीचे प्रदूषण… pic.twitter.com/pDNg4AGNe6
— NCP (@NCPspeaks) September 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा