पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गटातील नेत्यांना अजित पवार गटाकडून ब्लॅकमेंलिग केलं जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही रोहित पवारांना प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आता विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना अजित पवार गटाकडून ऑफर आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आल्याचं खुद्द एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मला अजित पवारांचा फोन आला होता. अमोल मिटकरींमार्फत त्यांनी बरोबर येण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर मी नाकारली. मी शरद पवारांसह आहे आणि त्यांच्याच बरोबर राहणार आहे. असं मी मिटकरींना सांगितलं. मला या दोन्ही नेत्यांनी ऑफर दिली होती. पण मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे आणि त्यांची साथ सोडणार नाही. असंही खडसे यांनी म्हटलंय.
“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
दरम्यान, बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार अशी माहिती समोर आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण