अहमदनगर : भाजपच्या वतीने अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात विशेष सल्ला दिला आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. असं विधान बावनकुळेंनी केलं आहे. त्यावरून आता राज्यात विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्या वक्तव्याचा कोल्हापूर मधील पत्रकार बांधवांनी काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवून कडकडीत निषेध केला आहे आणि आगामी दौऱ्यामध्ये त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना जाबही विचारणार आहेत. परंतू राज्यातील इततर जिल्ह्यातील पत्रकार बांधव कोल्हापूरच्या पत्रकार बांधवांकडून काही प्रेरणा घेणार आहेत का ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
दरम्यान, चहा-बिस्कीट देऊन व धाब्यावर नेऊन HMV पत्रकार कसे निर्माण करायचे, हा भाजपचा फॉर्म्यूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे जनतेला सांगितला आहे. जेव्हा पायाखालील वाळू सरकरत असते, तेव्हा अशा कल्पना येणं साहिजकच आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयडीया अजितबात नवल वाटत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील पत्रकारिता ही पुरोगामीत्वाच्या आदर्शांवर चालते. त्यामुळे मराठी पत्रकार बावनकुळेंच्या गोष्टींना भीक घालणार नाही. आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं तरी जनता भाजपला २०२४ मध्ये घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा कोल्हापूर मधील पत्रकार बांधवांनी तर काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवून कडकडीत निषेध केला आहे, आणि आगामी दौऱ्यामध्ये त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना जाबही विचारणार आहेत…
परंतु राज्यातील इतर जिल्ह्यातील पत्रकार…— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”