मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट पडले. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत पक्ष नेत्यांना घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीवर अजित पवार गटाने दावा सांगितल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेलं असून याची सुनावणी ३ ऑक्टोंबरला होणार आहे. यातच आता शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
नागालॅंडमधील ७ आमदारांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता राज्याबरोबर राष्ट्रीय पातळीवर देखील शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात दाखल होत असल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच नागालॅंडमधील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांनी अधिकृतरित्या एनडीएला पाठिंबा द्यावा असे लेखी पत्र शरद पवार यांच्या परवानगीने मार्चमध्येच दिले होते. त्याच वेळी खरे तर आम्ही एनडीमध्ये सहभागी झालो होतो, असा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला आहे.
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
दरम्यान, आज आम्ही एनडीएचे घटक झाले असलो तरी नागालँडमधील आमदारांना परवानगी दिली गेली, त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिद्ध होते, असेही पटेल म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभेचे ५३ पैकी ४३, तर विधान परिषदेचे ९ पैकी ६ आमदार आमच्या बाजूने आहेत. नागालँडमधील ७ आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधीच्या संख्येचा विचार करता, आमचा पक्षच अधिकृत आहे. त्याचबरोबर आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्याने केवळ महाराष्ट्र आणि नागालँडमध्येच पक्षाची मान्यता आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे निवडून न येता नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे हे पक्षाच्या घटनेत कायद्याने योग्य व अधिकृत नाही, असा दावाही पटेल यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार