मुंबई : शिवसेना १५ आमदार अपात्रते संदर्भात सध्या विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी अपात्र होऊ शकतात, ही शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राहूल नार्वेकर यांच्या अलिकडेच दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या बाजूने मोठी धाकधूक वाढली आहे. यातच शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी बोचरी टिका केली आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेश दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह काही प्रशासकीय अधिकारी १ ऑक्टोंबरला परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंड आणि जर्मनी असा दहा दिवसांचा त्यांचा परदेश दौरा होता. हा दौरा नेमका कधी होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. याचं वेळापत्रक देखील आलं नाही. पंरतू परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. यातच आता राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता हा परदेश दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
दरम्यान, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी आठवडाभराच्या परदेश दौऱ्याचे नियोजन केलं असून आपल्या देशाला आणि राज्याला गुंतवणूक किंवा ओळख मिळवून देणाऱ्या परदेश दौऱ्यांवर माझा आक्षेप नाही. परंतू हा दौरा त्यांच्या दावोसच्या सहलीसारखा असू नये, ज्या दौऱ्यावर सरकारने २८ तासांसाठी जवळपास ४० कोटी खर्च केले. दावोस दौऱ्यातील कोणत्याही बैठकीचे वेळापत्रक नाही, फोटो नाहीत. दावोस ट्रिपच्या खर्चाचा खरा आकडा सरकार अजूनही लपवत आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या या १० दिवसांच्या सहलीचे वेळापत्रक दौऱ्यावर जाण्यापूर्वी जाहीर केले पाहिजे. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
The illegal cm has planned a week long foreign trip. While I have no objection to foreign trips that bring investment or recognition to our nation or state, it cannot be like his Davos trip where the govt spent almost ₹40 crores on a 28 hour holiday.
There were no meeting…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजप आणि शिंदे गटाचा वाद मिटला, ‘ती’ जागा कुणाच्या वाटेला ?
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”