बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. यातत पंकजा मुंडे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला १९ कोटी रूपयांच्या जीएसटी थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हा जीएसटी न भरल्यास कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचंही नोटीशीमध्ये उल्लेख केला आहे. साखर कारखान्यावर केलेले गैरव्यवहार फेटाळून लावत आपला कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असल्याचं मुंडेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
जे आकडे सांगितलं जात आहेत, ते फक्त व्याजाचे आहेत. कारखान्यात कोणत्याही चुकीच्या पद्धतीने काहीही झालं नाही. कारखाना नुकसानीतून जात असतांना शेतकऱ्यांचे पैसे अदा केलेत. अन् येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही. उसा अभावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे केंद्र सरकारकडे मदतीसाठी गेले होते. त्यातही माझं नाव होतं. त्यात मी सोडून सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झाली आहे. ती जर झाली असती तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
दरम्यान, मी सहनशील कन्या देखील आहे. भाजपचे नेते कोंडी करत आहेत का ? या प्रश्नांवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, किती दिवस माझी कोंडी करणार हे ज्योतिषाला विचारून सांगेन असं देखील पंकजा मुंडेंनी सांगितलं. तसेच संघर्ष करून यातून मार्ग काढेन, चूकीच्या गोष्टी करणार नाहीत. वैद्यनाथ साखर कारखान्याने युनियन बॅंकेतून १२०० कोटी रूपयांचे कर्जही घेतले होते. पण त्याची परतफेड न केल्याने बॅंकेने यापूर्वीच कारखाना सील केला आहे. त्यातच आता या कारखान्यासाठी जीएसटी थकबाकीची नोटीस आली आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…२ महिन्यांत मराठा पाट्या लावा, कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश, राज ठाकरे म्हणाले, “मूठभर व्यापाऱ्यांनी हा..,”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचा बोचरा घाव, अन् एकनाथ शिंदेंनी दौराच रद्द केला, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…भाजप आणि शिंदे गटाचा वाद मिटला, ‘ती’ जागा कुणाच्या वाटेला ?
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली