मुंबई : शिवसेना १५ आमदार अपात्रते संदर्भात सध्या विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी अपात्र होऊ शकतात, ही शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राहूल नार्वेकर यांच्या अलिकडेच दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या बाजूने मोठी धाकधूक वाढली आहे. यातच शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी बोचरी टिका केली आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेश दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…२ महिन्यांत मराठा पाट्या लावा, कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश, राज ठाकरे म्हणाले, “मूठभर व्यापाऱ्यांनी हा..,”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह काही प्रशासकीय अधिकारी १ ऑक्टोंबरला परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंड आणि जर्मनी असा दहा दिवसांचा त्यांचा परदेश दौरा होता. हा दौरा नेमका कधी होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. याचं वेळापत्रक देखील आलं नाही. पंरतू परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. यातच आता राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता हा परदेश दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचा बोचरा घाव, अन् एकनाथ शिंदेंनी दौराच रद्द केला, पाहा नेमकं काय घडलं ?
दरम्यान, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या बहाण्याने आयोजित केलेल्या परदेशी पर्यटनावर प्रश्न विचारणारे ट्विट मी काल केले होते. माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. यावरून स्पष्ट होते की, हा दौरा म्हणजे राज्याच्या कामासाठीची बैठक नसून निव्व्ळ परदेशवारी होती. मागे देखील दावोसच्या 28 तासांच्या सहलीवर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी करदात्यांच्या 40 कोटींचा चुराडा केला होता. सरकारच्या परदेश दौऱ्यातून राज्याला काही लाभ होणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही पण करदात्यांच्या पैशावर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाणे, आम्हाला मंजूर नाही. मी प्रश्न विचारताच ही ‘सहल’ रद्द झाली. डर अच्छा है! असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या बहाण्याने आयोजित केलेल्या परदेशी पर्यटनावर प्रश्न विचारणारे ट्विट मी काल केले होते. माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला.
यावरून स्पष्ट होते की, हा दौरा म्हणजे राज्याच्या कामासाठीची बैठक नसून निव्व्ळ परदेशवारी होती.… pic.twitter.com/nsbKJTPz1Q
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…नागपूर शहरही तुंबलं, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी पैशाचं काय झालं ? सेनेचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…भाजपचे नेते कोंडी करीत आहेत का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी दिलं हसून उत्तर म्हणाल्या.., “