मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत फुटीर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला पाहिजे होता. परंतु तो घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे कान टोचून त्यांना तातडीने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यातच शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू हेच आहेत हे ही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रतोदपदी भरत गोगावलेंची केलेली नियुक्ती न्यायालयाने रद्द केली आहे. परंतु यावर आता विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याची टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा..“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला गालबोट लागेल आणि महाराष्ट्राची बदनामी होईल. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी नियमानुसार तात्काळ निर्णय घ्यावा. कोणाच्या तरी दबावाखाली चालढकल करून महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय परंपरेला काळीमा लावू नये. असं देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकरांनी अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी बोलवली होती. परंतु सर्व आमदारांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी नको, असं शिंदे गटाच्या वकिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत फुटीर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घ्यायला पाहिजे होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे कान टोचून त्यांना तातडीने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू हेच आहेत हे ही न्यायालयाने स्पष्ट केले… pic.twitter.com/U0Q7W8m33k
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”