ठाणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तीन माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आतापर्यंत मुंबईत उबाठा गटाच्या ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या ३६ वर गेली आहे.याचा मोठा फटका ठाकरेंना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश झाला. त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
हेही वाचा…गिरीश महाजनांनी धनगर समाजाला ‘तो’ शब्द दिला, अन् २१ दिवस सुरूअसलेलं उपोषण घेतलं मागे
दरम्यान, मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार आहे. आज वर्षा या निवासस्थानी अनेक देशांचे राजदूत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मुंबईत सध्या सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून हे शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पाऊस थांबल्यानंतर सिमेंटचे रस्ते करण्याच्या कामाला गती येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचं शिंदेंनी नगरसेवकांना सांगितले. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर हेदेखील उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे तसेच त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये… pic.twitter.com/HAaCtWLoCv
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव