सोलापूर : करोनाचा प्रादुर्भाव असतानाही मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेत भाविकांची अनियंत्रित गर्दी होऊन शासनाच्या नियम व अटींचे पालन न झाल्यामुळे अखेर त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करून लाठीमार केला. याप्रकरणी देवस्थान यात्रा समितीच्या पदाधिका-यांसह ७४ जणांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात्रेत गावातील ओढ्यावर पालखी सोहळा होतो. महालिंगराया (हुलजंती), शीलवंती (उमरगा), बिरोबा (शिरढोण), विठोबा (सोन्याळ, ता. जत), जकराया (येणकी, ता. मोहोळ), बिराप्पा (जिरानकलगी) आदी गावांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या भेटीसाठी येतात. यंदा करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यात्रेत शासनाच्या नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी यात्रा समितीला दिल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यात्रेत हजारो भाविक आले होते. परंतु त्यात सामाजिक अंतराचे पालन केले जात नव्हते.
मुखपट्टीचाही वापर होत नव्हता. राष्ट्रीय साथीचे रोग प्रतिबंधक कायदा व साथनियंत्रण कायद्यासह मुंबई पोलीस अधिनियमाचा भंग केल्यामुळे पोलिसांना भाविकांच्या वाढलेल्या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला.
करोनाकाळात बंद असलेली देवस्थाने अखेर आठ महिन्यांनी खुली झाली असतानाच मंगळवेढा तालुक्यात हुलजंती येथे महालिंगराया यात्रेत जमावबंदीसह अन्य शासकीय नियम व अटींचे पालन न करता भाविकांच्या अनियंत्रित गर्दीत पालखी सोहळा होत असताना पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार सूचना करून गर्दी कमी न होता पुन्हा वाढू लागल्यामुळे पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.
Read Also :
आयुष्यात काय कमावलं ? बाळासाहेब थोरात म्हणाले…
राम कदम ढोल ताशे वाजवत, गुलाल उधळत जाणार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण
आशिष शेलारांकडे मोठी जबाबदारी, ‘या’ निवडणुकीसाठी सहप्रभारी नियुक्ती
‘उशिरा सुचलेले शहाणपण’, धार्मिकस्थळे उघडण्यावरून आठवलेंचा सरकारला टोला